सासुची काळजी

7.7K 19 5
                                    

विश्वास (वय २८) आणि कल्पना (वय २५) यांचं लग्न होऊन आता २ वर्षं झाली. दोघं एकत्र कॉलेजमध्ये शिकत असतानाच प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. कॉलेज झाल्या झाल्या दोघांनाही चांगल्या नोकऱ्या लागल्या होत्या. विश्वास फार चांगला मुलगा होता. कल्पनाच्या वडिलांना मात्र एकच चिंता होती आणि ती म्हणजे विश्वासला सावत्र आई होती. विश्वासची खरी आई तो ४ वर्षांचा असतानाच गेली. त्यानंतर काही वर्षं त्याच्या वडिलांनी त्याला एकट्याने सांभाळलं. पण एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत असणाऱ्या त्याच्या वडिलांना विश्वासकडे पुरेसं लक्ष देणं शक्य होईना झालं तेव्हा त्यांनी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला.

विश्वासची सावत्र आई मीरा ही फार चांगली बाई होती. तिने विश्वासला मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलं. पण सावत्र आईबद्दल समाजाचे असणारे गैरसमज कल्पनाच्या वडिलांच्या मनात देखील होते. आधीच सावत्र आई असणारी ही मीरा सासू म्हणून आपल्या मुलीला त्रास तर देणार नाही ना अशी चिंता त्यांना होती. पण लग्नाची बोलणी करण्याच्या निमित्ताने जेव्हा दोन्ही कुटुंबं एकमेकांना भेटली तेव्हा सगळ्या शंका फिटल्या. मीरा आणि मोहनराव यांचा मुलगा विश्वास याचं लग्न रेखा आणि भास्कर यांची मुलगी कल्पना हिच्याशी मोठ्या धूमधडाक्यात झालं.

लग्नानंतर दोघेही आपल्या नोकरीनिमित्त मुंबईहून पुण्यात येऊन स्थायिक झाले. अधूनमधून त्यांचे आई-वडील पुण्याला या दोघांकडे राहायला यायचे, तर कधी हे दोघे मुंबईला त्यांच्याकडे जायचे. विश्वास आणि कल्पनाचा संसार अगदी सुखाचा सुरू होता. पण सगळं सुरळीत असतानाच एक मोठा धक्का या कुटुंबाला बसला जेव्हा कल्पनाचे वडील भास्करराव हृदयविकाराचा धक्का येऊन देवाघरी गेले. कल्पनाची आई रेखा यांना हे फार जड गेलं. भास्करराव अवघ्या ४९ वर्षे वयाचे होते. भास्करराव आणि रेखा यांनी मुलीच्या लग्नाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर आत्ता तर कुठे मनसोक्त जगायचं ठरवलं होतं. गेल्याच वर्षी ते युरोपला सहलीला जाऊन आले होते. यंदा सिंगापूर, थायलंडला जावं असाही विचार होता पण तेवढ्यात हे घडलं होतं. मोठा उमदा माणूस, धडधाकट असणारा, अचानक गेला. रेखाला हे पचवणं अवघड जाणं स्वाभाविक होतं.

सासूची काळजी Where stories live. Discover now