प्रेमाबद्दल थोड बोलू

19 0 2
                                    

प्रेमात पडल्यावर कस वाटत हे सगळ्यांनाच अनुभवता येत नाही ,अगदीच असं काही नाहीये . सगळेच प्रेमात पडतात . काहीजण त्या प्रेमाला समोरच्या व्यक्ती कडे व्यक्त करतात . काहीजण नाही करत . कोणाला व्यक्त होण्याची भीती वाटते . तर कोणाला व्यक्त झाल्यानंतर विभक्त होण्याची भीती वाटते . कोणी कसलाच विचार न करून जे होईल ते आपल नशीब समजून बिनधास्त बोलून टाकतो . तर कोणी काहीही न बोलता आहे त्यात समाधान मानतो .
                  कोणाला स्वतःसाठी व्यक्त व्हावं वाटत तर कोणाला दुसऱ्या साठी व्यक्त व्हावं वाटत . कोणी परिणामाचा विचार करत शांत बसत . तर कोणी परिणाम हा शब्दचं अस्तित्वात नसल्या सारखं वागतो . कोणीतरी आपल्या वागण्याला कंटाळल असेल याची साधी तसदि सुद्दा कोणी घेत नाही .
                 काही वेळेला तर आपल्या भावना भावना असतात आणि दुसऱ्याच्या भावना कचरा . असं वागतात लोक . कळत नाही ठरवून असं वागतात कि खरोखर त्यांचा स्वभावच तसा आहे . स्वभावच असा असेल तर काय खरोखर यांना कधी खर प्रेम झाल असेल कोणावर ???
       प्रेमाची व्याख्या सांगणारी खूप माणसं आजपर्यंत मला भेटली . प्रत्येकाची व्याख्या जरी वेगळी असली तरी अर्थ मात्र एकच होता . या जगात प्रेम नाही तर काही नाही . जर प्रेम नसतंच तर माणूस खूप स्वार्थी होऊन बसला असता . जर प्रेमच सगळं काही आहे तर मग ते प्रत्येकाच्या वाट्याला यायला हवं .
           आज कोणाचं कोणाशी मन जुळतय तर दुसरीकडे दोन मन एकमेकांपासून खूप दूर जातायत . दूर होण्याची प्रत्येकाची कारण वेगवेगळी आहेत . कोणी यातून खरंच मुक्त होऊ इच्छित आहे,  तर कोणी त्यातून मनाविरुद्ध मुक्त होत . या सगळ्यात एक गोष्ट खूप तीव्रतेने होत जाते ती म्हणजे समोरची व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते . डिप्रेशन मध्ये येऊन कोणी नशेच्या आहारी जात तर कोणी स्वतःला कायमच विसरून जात .
                  यावर पण लेक्चर देणारे खूप असतात .
. तुम्हाला तर कारणच पाहिजे नशा करायला .
. ज्याला यातून बाहेर पडायचे आहे ना तो कसाही पडतो .
. विसर त्याला /तिला आयुष्यात पुढे जा दुसर कोणीतरी खूप छान भेटेल .
. जाऊदे तू ना आता लग्नाचं बघ .
. अरे एक गेली/ गेला दुसरी/दुसरा भेटेल.
. ती / तो तुझ्या लायक च नव्हता/ नव्हती.
.म्हणून म्हणतो प्रेमात नका पडू .
               अस एक ना अनेक लेक्चर्स ऐकावी लागतात .
का तर आपण आपली कहाणी त्यांना सांगून आपल मन मोकळं करण्याचा प्रयत्न करत असतो . पण नाही त्यांना त्यावेळी खूप मोठं फिलोसोपर बनायचं असतं . अरे कोणीतरी कधीतरी त्यांची अवस्था समजून घ्या . त्यांना काय वाटतं आहे. प्रेमात काय कोणी जाणून बुजून पडत का ??? नाही ना ...........  मग थोड समजून घ्या ना !
                 सगळे असे वागतात जस यांना कधी प्रेम झालंच नाही . यांनी कधी कोणावर प्रेम केलच नाही किंवा कदाचित यांना मन नसेल त्यामुळे ते कधी कोणावर आल नसेल .

       प्रेमाची मला कळलेली व्याख्या खूपच छान आहे . कदाचित त्यामुळेच आजपर्यंत मला कोणताही हक्क न गाजवता , कोणतंही बंधन न घालता , ना कोणती प्रॉमिस करता  फक्त आणि फक्त निस्वार्थी प्रेम करणारी माणसं भेटली.
प्रत्येकाच्या नशिबात नसेल ही या प्रेमाचा अनुभव . पण तो मला भेटला आहे . माझ्या घरच्यांच्या प्रेमातून माझे मित्र मैत्रिणी या सगळ्यांच्या प्रेमातून मला जाणवलं की प्रेम म्हणजे काय ? या सगळ्यानी अगदी निस्वार्थ माझ्यावर आतापर्यंत प्रेम केलं .
                किती बर झाल असत ना या जगात सगळ्यांना सारखंच प्रेम मिळालं असतं .



मनाला काहीतरी खटकल आणि मग हा लेख लिहून काढला . कारण म्हणतात ना मनातल्या भावना कागदावर उतरवाव्या म्हणजे मन हलकं होत आणि दुसर कोणाला त्याचा त्रास ही नाही होत आणि कोणी आपल्याला यावर डोकं फिरेल अस लेक्चर पण नाही देत . म्हणून मग मी आपल्या प्रतीलीपी कडे शेअर करतेय कारण मला माहितेय इथे लेक्चर नाही प्रेम मिळेल 🥰 .

धन्यवाद

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 06 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

प्रेमाबद्दल थोड बोलू Where stories live. Discover now