मुक्त (नवीन वळणावरची) भाग 5

1.1K 5 0
                                    

आकाश आणी अदिती

सकाळचे 9am

    आकाश पुण्यात आला तो स्वतःच्या अवतारात, म्हणजे गावठी म्हणाल तरी चालेल. अदितीला ते बघून खूप विचित्र वाटल.

अदिती  :  तुम्ही असे, का आलात.

आकाश  : असा म्हणजे कसा

अदिती  :  आहो म्हणजे निदान कपडे तरी चांगले
               घालायचे.

आकाश  हलकेच हसला.

आकाश : तु कधीपासून कपड्या वरून माणसं
               ओळखायला लागलीस.

अदिती : नाही पण.

आकाश   : मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे
             पण माझं स्वतःला बदलन शक्य नाही, मी असंच
            आहे.

अदितीला काय बोलाव सुचलं नाही.

आकाश  :  चल आपण फिरून येऊ.

अदिती त्याला नाही बोलू शकली नाही, दोघेही फिरत होते. आकाशला जाणवत होत, कि अदिती चांगल फील करत नाहीय. खर तर अदितीला त्याच्या अश्या अवतारात त्याच्या सोबत फिरण अवघड जात होते.

असंच फिरत असताना दोघे रस्ता क्रॉस करत होते, कि समोरच एक कार बसला धडकली, सगळीकडे अफरातफरी पसरली, कोणीच कार जवळ जात न्हवते सगळे फक्त बघ्याची भूमिका बजावत होते, अदिती पण त्यांच्या सारखी बघायला लागली पण आकाश समोर गेला, अदिती त्याला अडवत होती पण तो थांबला नाही,  त्याने पुढे जाऊन कारचा दरवाजा उघडला, एक व्यक्ती  मदतीला बोलवत होती , वेदने मुळे त्याच्या तोंडातुन शब्द बाहेर पडत न्हवते, आकाशने त्याला बाहेर काढलं, कसबस एक टॅक्सी अडवली आणी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल. अदिती त्याच्याकडे नवालाइने बघत होती, ऍक्सिडेंट झाल्यावर बघ्याची भूमीका बजावनारे आणी कशाचापण विचार नकरता मदतीला जाणारा आकाश यांच्यात खूप फरक होता. काही वेळाने पोलीस आले ऍक्सिडेंट बद्दल चौकशी केली आकाशची माहिती घेतली आणी त्यांना जायला सांगितलं. पण जाताना ते पोलीस अधिकारी म्हणाले.

पोलीस  :
              दादा तूझ्या सारखी माणसं खूप कमी राहिली
आहेत, तुझ्यातली ही माणुसकी खूप मोलाची आहे, जपून ठेव तिला अगदी तूझ्या या तुळशीमाळ आहे अगदी त्याच्या सारखी.

मुक्त (नवीन वळणावरची) भाग 2Where stories live. Discover now