1

1 0 0
                                    

सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या नैर्‌ऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंच आहे, तर पठारापासून १००० फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे.
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला 'आश्वलायनगड' म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९,पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

१८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे 'नवरससातारा' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jul 13, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

SajjangadWhere stories live. Discover now