शुभ किंवा अशुभ संकेत कसे ओळखावे? ( भाग.2)

4 1 0
                                    

ह्याबद्दल आपण मागील भागात काही महत्त्वाचा भाग पाहिला आहे. पुनश्च,शुभ / अशुभ संकेतावर आणखी काही  माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करू!
  1) घरात कुलदेवी बसवलेली असल्यास... कुलदेवीच्या श्री फलाला (नारळाला) तडा जाणे... याचा अर्थ.... कुलदेवी आपल्यावरील घाव / संकट स्वतःवर घेऊन भक्ताला सुरक्षित ठेवते अशी भावना आहे. नकारात्मकतेचा भाग कुलदेवी तत्त्व स्वतःवर घेऊन भक्ताचे रक्षण करते... हा भाग बहुतांशी वेळा आढळून आलेला आहे.
2) कुणीतरी घराच्या बाहेर निघताना' शिंक येणे 'हा भाग अशुभ समजला जातो. परंतु याचे अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे येताना दिसून येतात.
3) एका व्यक्तीला त्याचा आत्महत्या केलेला चुलत भाऊ याने स्वप्नात येऊन.. घट्ट मिठी मारली... व" मी तुला न्यायला आलो आहे असे उद्गार काढले  ".. काही कालावधीतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. परंतु अशा प्रकारचे अनुभव फार तुरळक येतात,त्यामुळे याने घाबरून जाऊ नये! मृत्यूचे संकेत आधीच दिले गेले होते.
4) काही वेळेला संकल्प सोडतानाच.... संकेत मिळाल्याचे पाहण्यात आहे. सदर साधक गणेश उपासनेचा संकल्प सोडण्याकरिता लागणारे फुल वगैरे साहित्य आणण्याकरिता बाजारात गेला होता. सर्व साहित्य घेऊन येताना वाटेतील... ग्रामदेवतेच्या मंदिरात जाण्याचा विचार त्याच्या मनात डोकाविला. प्रदक्षिणा मारून सहज देवी समोर... मी सदरचा गणेश अनुष्ठानचा संकल्प घेत आहे, तरी तू सहाय्यभूत हो अशी प्रार्थना करताना... देवीच्या डोक्यावरील फुलांचा गजरा डाव्या बाजूला पडला. हा खरं तर नकारात्मक संकेत होता. तरीही सदर साधकाने मोठया कष्टाने उपासना पूर्ण केली. परंतु फळप्राप्ती झाली नाही. कारण, नियतीने संकल्प सफल होणार नाही हे संकेत दिले होते. काळापेक्षा बलवान काहीही नाही.
5) हातातून सतत कुंकू सांडत असेल तर.....  घरातील देवीला कुंकू मार्जन करावे.' सांडण्याचा भाग ' साधनेतील कृती करण्याचे संकेत देतो.
6) सतत स्वप्नामध्ये मृत व्यक्ती येणे, पूर्वज येणे - पितृदोष असण्याचा संकेत आहे. सतत नाग /सर्प पाठलाग करतोय किंवा दंश करत आहे... अशा स्वप्नांचा अर्थ अर्थातच नागदोषाशी लावला जातो. आणि हा बऱ्याच अंशी खरा देखील असतो. स्वप्न संकेत दर्शक असतात!
7) आपण लावलेली तुळस मृत होणे किंवा सुकणे... अशावेळी बराच वेळेला नकारात्मकता तुळशीवर गेल्याची ही लक्षणं असतात.अर्थातच, हल्ली उगाचच तुळस ह्या दिशेला लावा, त्या दिशेला लावा.... हा प्रकार चालू आहे. त्यात काही अर्थ नाही. दिवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवला तरी प्रकाश देणारच! तुळस ही संकेत दर्शक ठरते. तुळशीचा संबंध बुध ह्या ग्रहाची येतो.
8) चप्पल चोरीला जाणे हे राहू ग्रहाचा संबंध दर्शवणारे असते.
9) दारावर लावलेले  कोहळा नकारात्मकता शोषून घेतल्यामुळे गळतो किंवा सडतो... असा अनुभव येताना दिसतो. सदर कोहळा वगैरे वस्तू घरासमोर टांगण्यापूर्वी त्याला सूचना देणे गरजेचे असते. हे एका अतींद्रीय फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते. परंतु हल्लीच्या काळात यावर कोणी विश्वास ठेवत नाही. कोहळ्यावर राहूच प्रभुत्व आहे. लगेच खराब होणारा कोहळा घरावर परिणाम करणारी नकारात्मकता जास्त आहे याचे संकेत देत असतो.
     अशा प्रकारे निसर्ग आपल्याला संकेत देण्याचे प्रयत्न करत असतो. आपण जितके जागृत असू, तेवढ्या प्रमाणात ते संकेत ग्रहण करू शकतो. आपल्याला संकेत मिळायला हवे हे "इच्छा  " आपल्या अंतरंगात रुजू देणे महत्त्वाचे आहे. अर्थातच ही इच्छा अंतरंगात रुजल्यावर ती  " जिवंत " ठेवणे देखील तेवढेच गरजेचे आहे! यातच काय समजायचे ते समजून जा! आपली 'जाणीव 'वृद्धिंगत झाली तरच... योग्य तो संकेत निसर्गाकडून आपल्याला मिळत असतो. निसर्ग मध्ये अनेक 'अज्ञात शक्ती' कार्य करत असतात. त्याच आपल्या मनातली भावना समजून, संकेत देण्याचे प्रयत्न करतात हेच गुढ रहस्य समजून घ्यावयाचे आहे.

🔆🔆गूढ ज्योतिषशास्त्राचे 🔆🔆Where stories live. Discover now