भाग 26

167 3 0
                                    

इजिप्तमध्ये :

भल्यामोठ्या डोंगराच्या तळाशी एक गुहा असते. तिच्या आत अग्निपुत्र एक यज्ञ करत होता. हा यज्ञ साधारण सहा महिन्यांपासून सुरु होता आणि तो आता पूर्णत्वास आला होता.

"सर्व आत्म्यांवर ताबा मिळवण्यासाठी आपल्या रक्ताची आहुती द्या." यज्ञातील अग्निमधुन आवाज आला आणि अग्निपुत्राने त्याचा एक हात कापून तो अग्नीला अर्पण केला. आगीचा मोठा भडका उडाला आणि काही क्षणातच अग्नी विझली. कापलेल्या हाताच्या ठिकाणी त्याला नव्याने हात आला. क्षण दोन क्षण शांतता होते आणि मोठ्या प्रमाणात तिथे आत्मे येऊ लागतात. ते सर्व आत्मे पारदर्शक होते. हळूहळू त्यांना शरीर प्राप्त होतं. त्यांच्यापैकी कुणी अर्धसर्पानुष्य, कुणी डायनोसोर, कुणी अश्मयुगीन मानव तर कुणी हिंस्त्र प्राणी या त्यांच्या पूर्वीच्या शरीरात आकाराला येतात. अग्निपुत्राच्या यज्ञाने त्यांना त्यांचं आधीचं शरीर पुन्हा एकदा प्राप्त होतं, जे पूर्वीप्रमानेच असेल आणि प्रसंगी त्यांना मारल्यास ते पुन्हा एकदा मरु शकतील. अग्निपुत्राने त्यांना एक जीवनदान दिलं होतं.

"अग्निपुत्राचा विजय असो. मी सुर्वज्ञ आहे. अर्धसर्पानुष्य प्रजातीचा राजा." त्यांच्यापैकी एक पुढे येत म्हणाला.

"ये सुर्वज्ञ, मला तुझ्यासरख्याच योद्धयाची गरज होती. एक काळ होता जेव्हा तू जवळपास सर्व मनुष्यप्राणी पृथ्वीवरुन संपवले होतेस. म्हणून तूच मला माझा सेनापती म्हणून योग्य वाटतोस. आजपासून तुझं नाव अग्निसूर्य असेल." अग्निपुत्र म्हणतो.

"देवा, तुमची आज्ञा हाच माझा धर्म. पण अशी कोणती लढाई करायची आहे, ज्यासाठी आपण आम्हा सर्वांना इथे बोलावल आहे?" अग्निसूर्य विचारतो.

"मनुष्यसंहाराची लढाई, मनुष्यप्राण्याने संपूर्ण पृथ्वीचा सत्यानाश केला आहे. त्याला या पृथ्वीतलावरून समूळ नष्ट करायचं आहे." अग्निसूर्य म्हणतो.

"पण देवा, हे काम म्हणावं तेवढं सोपं नाहिये." अग्निसूर्य म्हणतो.

अग्निपुत्रWhere stories live. Discover now