संधी भाग - 6 (कोकीळ)

5.7K 22 13
                                    

रात्री जेवण झाल्यावर प्रसादने अंजलीला तिच्या तो आल्यापासून शांत असण्याबद्दल विचारले. मुलाला झोपवून सांगते असे म्हणून अंजलीने झोपायची तयारी केली. अर्ध्यातासांनी दोघे त्या विषयावर परत आले.

"आज कोणीतरी भेटले मला. " अंजली म्हणाली. बोलताना तिच्या चेहऱ्यावर मृदुल अशी लाज होती.

" कोण? कुठे? " प्रसादच्या कपाळावर आठी आली.

" ऑनलाईन. " ती म्हणाली.

"अच्छा केलं होतंस का लॉगिन? कोण होता तो? एकाशीच बोललीस?" त्याने विचारले.

" हो. सतप्पा सोनजे म्हणून आहेत." ती म्हणाली.

"मी पाहू शकतो का तुमचं चॅट?" त्याने विचारले.

"नाही नको. प्लिज. मी फक्त तुम्हाला माहित असावे म्हणून सांगितले. पण तुम्ही यात खोलात जाऊ नका. कारण काहीही झालं तरी तुमच्या मनावर या गोष्टीचा कसलाही प्रभाव पडू नये असं मला वाटतं. म्हणून त्या अकौंटचा पासवर्ड पण मी चेंन्ज केलाय."

" मला नाही कसला त्रास होणार अंजु. पण ठीके तुला नको वाटतंय तर मी नाही घुसणार त्यात. पण तो माणूस कसा आहे? काय करतो आणि मला कसा नाही दिसला चॅट मध्ये आधी? " त्याने विचारले.

" तुम्ही दुर्लक्ष केलेत त्यांच्याकडे. जवळ जवळ आठेक दिवस रोज मेसेज करत होते ते. थोडे वयस्कर आहेत पहा. ते. " ती म्हणाली.

प्रसादला आठवले. " हा. हा. आठवले. अगं बघ ना साठी बुद्धी नाठी म्हणतात त्यातला प्रकार आहे. केवढा वयस्कर दिसतोय तो आणि खुशाल तरुण बायकांची स्वप्ने. " तो म्हणतच होता. तेवढ्यात अंजलीने त्याला रोखले.

" का? त्यांनी स्वप्ने बघू नयेत आणि फक्त तरुणांनी पहावीत आणि पूर्ण करावीत का?" ती म्हणाली.

" तसं नाही ग. पण तुला साजेसा पुरुष हवा म्हणून मग मी तुझ्यासाठी चांगला हँडसम आणि तगडा पुरुष निवडत होतो. " तो म्हणाला.

" पण अंतिम निवड माझीच असणार आहे हे मी तुम्हांला आधीच सांगितलंय. " तिने आठवण करून दिली.

संधीWhere stories live. Discover now