संधी भाग - 10 (प्रतीक्षा)

4K 15 9
                                    

"वाट पाहून खरंच कंटाळा आला मामा." कार मध्ये बसत रेणू म्हणाली.

तिच्या आत्याचे मिस्टर ज्यांना ती मामा म्हणायची ते तिला त्यांच्या घरी घेऊन चालले होते. प्रवास सुरु झाला मामा हायवे नेहमीच्या सवयीने उरकू लागले.

"होना उशीरच झाला खरा. अगं मी आलो असतो लवकर पण त्या कमिटीची मिटिंग लय लांबली. मला खूप काळजी वाटत व्हती खरंतर. तुला किती यळ वाट बघायला लागतीये. पण नशीब लवकर उरकलं. लगेच निघालो. इथं अंधार पण लगीच पडतो एकतर. बरं ते जाऊदे भूक लागली असल तुला. पुढं यखाद्या हाटेलात जेऊन घिऊ आणि मग जाऊ. घरी जास्तवर 2 तास लागतील. त्यात तुजी आत्या गेली आश्रमात उद्या कसला तर कार्यक्रम हाय तिकडं. " मामा तिला सांगत होते.

"वाट तर खूप बघावी लागलीये कशाची ते मात्र अजून समजायचंय..." रेणू स्वतःशीच म्हणाली.

रेणुका 29 वर्षांची विवाहिता तिच्या आत्याच्या गावी चालली होती. तिकडे तिच्या एका जुन्या मैत्रिणीचा साखरपुडा होता तो तिला अटेंड करायचा होता. तीचा नवरा येणार होता पण काही तातडीच्या कामाची अडचण असल्यामुळे त्याला जमले नाही. तीचा तिच्या आत्याला गावी येत आहे असा कॉल झाल्यावर तिला आत्याने सांगितले कि मामा तुमच्या शहराजवळ त्यांच्या गावातल्या सहकारी बँकेच्या कमिटी मिटिंग साठी येणारेत. त्यांना तिथं भेट आणि त्यांच्या सोबतच ये. मामांना यायला मात्र तासभर उशीर झाला. ती बस स्टॅंडच्या बाहेर येऊन त्यांची वाट पाहत होती. शेवटी ते भेटले.

गबाजी केंजळे. तिच्या आत्याचे मिस्टर त्यांच्या गावातली एक मात्तबर असामी. शेकडो एकर शेती उत्पन्न, स्वतः प्रयत्न करून उभारलेली सहकारी पतसंस्था, गावकीत मान सगळं काही होतं. केंजळे मामा सर्व काही पाहत मग्न आयुष्य घालवत होते. त्यांना दोन मुले एक शिकायला बाहेर आणि एक उच्च शिक्षण घेऊन करून जॉब साठी परदेशी. त्यांचं वय 55-60 दरम्यानच असलं तरी तब्येत आणि अंगकाठी रोजची शेतावरची रपेट आणि व्यस्त जीवन यामुळे मापात होती. ह्या आत्या आणि मामांचा रेणूवर जरा विशेष जीव होता. तिच्या आत्याच्या लग्नात चार वर्षांची असल्यापासून रेणुका त्यांच्या घरी जवळ जवळ दरवर्षी सुट्ट्यामध्ये जात राहिली. नंतर शिक्षण आणि लग्न ह्या कालखंडात थोडा फरक पडला पण जिव्हाळा मात्र आटला नाही. केंजळेना रेणू तितकीच जवळची वाटत.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: 5 days ago ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

संधीWhere stories live. Discover now