Ashima

462 0 0
                                    


अशिमाचं नाव मी नवीन कॉलेज जॉईन केल्यापासून काही दिवस सतत ऐकत आलो होतो. कोणत्याही कॉलेजचं नवीन वर्ष सुरु झालं कि मुलांच्या चर्चेचा महत्वाचा विषय असतो, नवीन जॉईन झालेली झालेल्या मुली. पण आमच्या ज्युनिअर कॉलेजला लागूनच त्याच संस्थेचं सिनिअर कॉलेजही होतं. त्यामुळे मुलांच्या चर्चेत सिनिअर मुलींचीही नावं असायची.. आणि त्यात सर्वात जास्त चर्चेतलं नाव होतं अशिमा. गम्मत अशी होती कि, सगळे तिच्याबद्दल बोलत असले तरीही तिला पाहिलं कुणीच नव्हतं. कारण ती कॉलेज खूप कमी अटेंड करायची. कुणी म्हणत, ती पैसेवाली होती, तिला डीग्रीची गरजच नव्हती. कुणी म्हणत, तिचं कॉलेजच्या प्रोफेसर्ससोबत सेटिंग आहे.. ज्यामुळं तिला अटेन्डन्सचा प्रॉब्लेम येत नाही. कुणी म्हणायचं ती प्रत्येक आठवड्याला बॉयफ्रेंड बदलते.. कुणी म्हणायचं ती दिसायला खूप कडक आहे, वगैरे. पण प्रत्यक्षात काही जणांनीच तिला पाहिलं होतं. इतर सगळे केवळ ऐकलेल्या अफवा चघळून चघळून गप्पा झाडत होते. मला स्वतःला या चर्चेत रस नव्हता. सेजलच्या जाण्याच्या धक्क्यातून मी अजून सावरलो नव्हतो.. आणि नवीन क्लासमेट्ससोबत फारसं सूत जुळलेलं नव्हतं. त्यामुळं मी सतत एकटा रहायचो. मी केवळ अभ्यासाकडे आणि फिटनेसकडं लक्ष द्यायचं ठरवलं होतं आणि जिम जॉईन केलं होतं. काही दिवसांतच माझं सिक्स पॅक तयार होऊ लागलं होतं आणि मी त्यातच खुश होतो.

क्लासमध्येही माझी खिडकीतली जग ठरलेली होती. क्लासमध्ये लक्ष लागत नसलं तर मी खिडकीतून बाहेर बघत बसायचो. तिथून कॉलेजच्या मागची बाजू दिसायची. केवळ काही मोकळे प्लॉट्स, आणि त्यापलीकडे झाडी. आणि त्या प्लॉट्समधून जाणारा एकमेव मोठा डांबरी रस्ता. तो रस्ता पुढं जाऊन बंद झालेलं होता. काही प्रॉब्लेम्समुळं त्याचं काम बंद करण्यात आलं होतं. त्या रस्त्याकडे पाहून मला नेहमी शांत वाटायचं. तिकडं कुणीच जात नसे. कधीकधी फक्त एक-दोन कार्स तिथे थांबलेल्या दिसायच्या. श्रीमंत मुलं तिथं स्मोक किंवा ड्रिंक करण्यासाठी जायची. नंतर कळलं कि काही मुलं गर्लफ्रेंडला घेऊनही तिथे जायची. प्रायव्हसीसाठी.

Women in my lifeWhere stories live. Discover now