२.क्लास मधलं स्पर्धेशीर प्रेम

269 2 0
                                    


वर्ग इयत्ता 10 वी, 10 वी म्हणजे महत्वाचं आणि मेहनतीचं वर्ष. या वर्षात फक्त अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच करायला लागतो. पण हे माझ्या हृदयाला कोण समजवणार. 10 वी च्या वर्षामुळे मी क्लास बदलला होता आणि एका नवीन शिकवणीत होते. जिथे भरपूर विद्यार्थी होते. त्यांची वेगळी बॅच होती. जी सतत बदलायची. प्रवेश घेतल्यावर पुन्हा त्याच आवेशाने मी अभ्यास करायचे ठरवले होते. माझ्या हुशार पणाला आता तरी दाद मिळणार. पहिला दिवस त्याच जोमाने मी अभ्यास केला. पण पहिल्याच रात्री शिकवणी चालू झाल्यावर मला तो(माझा नवीन क्रश) दिसला. तो फारच हुशार आणि हाज़िरजवाबी होता. शिक्षकांना सारखं प्रश्न विचारणारा नाही तर शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणारा. त्या बॅचमध्ये आधीच त्याच्या वर्गाचे मित्र होते. त्यामुळे तो शांत आणि साधा नाही वाटायचा. तो गोंधळ घालणारा होता पण त्याच्यापासून कोणालाही धोका नव्हता. तो स्वतः सोबत दुसर्यांना हि अभ्यासासाठी प्रवृत्त करणारा होता. पहिल्याच क्षणी मला तो आवडू लागला. फक्त त्याच्या दिसण्यामुळे नाही तर त्याच्या या हुशार स्वभावामुळे. त्याचे वर्णन करायचे झाले तर त्याची उंची माझ्याहून थोडी अधिक, छोटासा चेहरा, बोलके डोळे आणि महत्वाचं म्हणजे त्याचं गोड हसू. ते हसू सतत माझ्या नजरेत सामावून घ्यावे. त्याचे नाव जाणून घ्यायला माझ्यासोबतच शिक्षकही तत्पर होते.

आमची भेट फक्त संध्याकाळच्या शिकवणीलाच व्हायची. त्या 2 तासाच्या त्याच्या भेटीमुळे त्याला सतत पाहायची गोडी माझ्या मनात निर्माण झाली. फक्त संध्याकाळीच का त्याला दिवसभर पाहत राहावे हेच मला वाटायचे. त्याचा चेहराच नाही तर त्याची मस्ती, त्याचं त्याच्या मित्रांना चिडवणे एकटक स्मितहास्य करत पाहत राहावे असं मला वाटायचे. एक आठवडा तर माझा असाच त्याला पाहण्यातच गेला. रविवार आला. रविवारी तो मला दिसेन कि नाही हे मला माहित नव्हतं. माझा क्लास सकाळी 11 ते दुपारी 3 वाजपेर्यंत होता. ज्यात शिकवणी आणि सराव या दोन्ही गोष्टी येत होत्या. पण आज शिकवणी होती विज्ञानाची. मी ठरली मराठी माध्यमाची आणि तो ठरला सेमी इंग्रजीचा विद्यार्थी. म्हणजेच विज्ञान आणि गणित त्याला इंग्रजीतून होतं. गणित तर आम्ही सोबतच शिकयचो पण विज्ञानासाठी दुसरीच शिकवणी होणार. म्हणजे आम्ही आज भेटणार नाही. इतका वेळ तो मला दिसणार नाही. मी हा वेळ काढायचा तरी कसा? जड जाईल ही वेळ मला!

क्रश फक्त एकतर्फी प्रेम!Where stories live. Discover now