७. ट्रेन क्रश

82 3 0
                                    

कधी तुम्हाला असं वाटलं का, मोठा प्रवास करताना कोणीतरी असं दिसावं कि ज्याच्या फक्त असण्यानेच प्रवास सुखद होईल! कधी मोठ्या प्रवासात एकटच असू; तेव्हा सोबत कोणी बोलायला हवं! शेवटी; आपण आपल्या गन्तव्य स्थानी पोहचू. आपला सम्पर्क तिथेच संपेल आणि काही दिवसाने उगाच त्याने सम्पर्क साधावा. माझ्यासोबत असं कधीही झालं नाही. पण आजही जेव्हाही मी प्रवास चालू करते तेव्हा मला वाटतं की कोणीतरी समोरच्या सीट वर असावा जो माझ्या कॉलेज चा, माझ्या वर्गाचा, माझ्या ओळखीतला जुना क्रश किंवा नवीनच कोणी तरी 'जुनी ओळख आहे' असा वाटणारा भेटावा. तश्या प्रवासात माझ्या मैत्रिणी खूप बनल्या असतील. आईला तिच्या गावातली जुनी ओळख भेटली असेल. बाबाना त्यांच्याच फील्ड मधला मित्र प्रवासाच्या रूपात भेटला असेल. काही क्षणी मला ही मैत्रीण भेटली असेल. पण मित्र मला कधीही भेटला नव्हता. हे तर झालं मोठ्या प्रवासाचं.

मी मुंबईकर आहे! मुंबईकर म्हटलं कि लोकल ट्रेन येणारच. मी गेले 6-7 वर्षांपासून लोकल ट्रेन चा प्रवास करत आले आहे. कधी कधी सोपं नसायचं हो दादर पासून फास्ट ट्रेन पकडणं. पकडल्यावरही बसायला जागा मिळणं. प्रवास मोठा असला तरी त्यात भरपूर मैत्रिणी बनायच्या. मी ज्या डब्ब्यात बसायचे त्याच्या शेजारील डब्ब्यात फर्स्ट क्लास लेडीज आणि नन्तर जनरल डब्बा होता. ज्यात असायचा तो. रोज संध्याकाळी ट्रेनच्या थंड हवेत तो खिडकीत बसून झोपी गेलेला असायचा. आम्ही कधीही बोललो नसावं. तो कुठून चढायचा हे मला माहित नव्हतं. पण तो कल्याणला उतरायचा. कधीकधी मुलांकडून मिळणारा क्वचितच गुण त्याच्यात होता. 'शांततेचा.'

त्याच्या चेहऱ्यावर शांतता ट्रेन मध्ये वाहणाऱ्या थंड हवेसारखी पसरलेली असायची. तो प्रवास करायचा ती ट्रेन मिळावी म्हणून मी थोडं उशिराच निघायचे. परेल वरून दादरला यायचे. मग ती फास्ट ट्रेन पकडायचे. ती कधीही चुकू नये असाच माझा प्रयत्न असायचा. तो दिसावा म्हणून मी कधीच जागेवर बसले नव्हते. दादर ते कल्याण मी उभे राहूनच प्रवास केला होता. तर हे सगळं चालू झालं कोरोना काळाच्या 1 वर्षाआधी. मी परेल ला कामाला जायचे. परेल हे दादरच्या पुढचे स्टेशन! मी तिथून घाईघाईने लवकर निघायचे आणि परेल वरून स्लो ट्रेन पकडायचे. तिथून कल्याण पर्यंत मी कंटाळून जायचे. एक दिवस दादर वरून फास्ट ट्रेन पकडून आपले 15 30 मिनिटे वाचवावे हा प्रयत्न मी केला होता. तरीही तो प्रवास मला नेहमीपेक्षा बरा वाटला. कारण कंटाळवाण्या ट्रेन मध्ये इतका वेळ नाही जायचा. 1 2 महिने मी तसाच प्रवास केला होता.

क्रश फक्त एकतर्फी प्रेम!Where stories live. Discover now