६. तो ज्याला माझं प्रेम माहीत नव्हतं

80 2 2
                                    


माझा मित्र, माझा वाटेकरू, माझा वर्गमित्र किंवा ट्युशन मित्र. यापेक्षा निराळा होता तो. माझा कलीग. पण लांबचा कलीग. त्याला 'निराळा' म्हणण्याचं कारण हेच कि आम्ही एकमेकांना अजिबात ओळखायचो नाही. पण आम्ही एकाच कंपनीचे एम्प्लॉयी होतो. त्यामुळे कधी गणेश उत्सव, दिवाळी किंवा नवरात्रीला आम्ही हमखास एकत्र यायचो. आम्ही मित्र नव्हतो. मैत्री मला करायचीही नव्हती. जेव्हा ऑफिस असायचं तेव्हा त्याची वाट पाहायचे, नन्तर त्याला जाताना पाहायचे. तो समोरून येत असेल तर त्याच्या डोळ्यात एखाद्या वेड्या मुलीसारखे पाहायचे. तो गेल्यावर पुन्हा कामात रमायचे. जेवताना मी एकटीच शतपाउली करायचे. तो त्याच्या मित्र मैत्रिणीसोबत असायचा. त्यापैकी कोणीही माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही. त्यात त्यानेही कधी माझ्याकडे पाहिले नव्हते. मला माहित होतं, आमचं काही होऊ शकत नाही आणि मला पुढे काही होऊ द्यायचे ही नव्हते. फक्त त्याला असंच पाहत राहायचे होते.

एकदा प्रेमात ठोकर लागल्यावर व्यक्ती असाच होतो का? नक्कीच हे प्रेम नव्हतं. मला ते करायचं ही नव्हतं. फक्त त्याला असंच रोज पाहायचे. जर संधी मिळालीच तर त्याला मित्र म्हणून स्वीकारायचे होते. या एकतर्फी प्रेमात फक्त त्यांना बघूनच मनाचं खूप समाधान होतं हो! आश्चर्य म्हणजे तो कसा दिसायचा हे मी घरी येताच विसरायचे. दुसऱ्या दिवशी त्याला पाहताच म्हणायचे, 'तर असा दिसतो हा.' मला त्याचे डोळे आणि हसू खूप आवडलं होतं. त्याला हसताना बघणं म्हणजे साक्षात स्वर्गाचा एक फेरफटका मारून येणं असं होतं.

दिवसामागून दिवस जात होते. आता त्याचा चेहरा जरी लक्षात नसला तरी त्याचे डोळे आणि त्याचं हसू माझ्या बरोबर लक्षात राहत होतं. आता तर त्याचा आवाजही ऐकायला मिळणार होता. आमच्या ऑफिस ची गम्मत म्हणजे आमची जागा सारखी बदलत राहायची. नेमकी माझ्या टीम ची जागा त्याच्या आजूबाजूला गेली. माझंच दुर्देव, मी माझ्या जुन्या जागेवरच राहिले! आता त्याचं नाव आणि त्याच्या संवादात कधीकधी माझा सहभाग ही व्हायचा. एकंदरीत त्याची मैत्रीण नसली तरी त्याच्या ओळखीतली कोणीतरी मी होते. नाव समजलं म्हणजे टीम मधून त्याचा फोन नंबर मिळणे माझ्यासाठी कठीण नव्हते. फक्त इतकंच कि मी त्याचा कधीही फोटो पाहिला नव्हता. नाव समजताच मी त्याला शक्य तितक्या सर्व सोशल मीडिया वर शोधले पण तो काही मिळाला नाही.

क्रश फक्त एकतर्फी प्रेम!Where stories live. Discover now