४. कॉलेज चा नायक

111 2 0
                                    


प्रत्येक कॉलेज मध्ये कोणीतरी असा असतो ज्याच्यावर सगळेच जण प्रेम करतात. किंवा अशी मुलगी तरी असते जिच्यावर मुले उगाचच प्रेम करतात. तिला माझे मित्र 'अप्सरा' म्हणायचे आणि अश्या मुलाला आम्ही मुली 'तुमचे भाऊजी' असं म्हणायचो. काहीजण त्याला 'हॅंडसम' म्हणायचे. पण अश्या मुलींवर काही जण जळायचे. आश्चर्य म्हणजे त्या अप्सरेला कधी कधी माहीतच नसायचे कि तिच्यावर इतके जण लक्ष ठेऊन आहेत. अश्या मुलांनाही माहित नसायचे कि त्यांच्यासाठी इतक्या मुली स्वप्न बघत असतील. सगळ्याच कॉलेज मध्ये अश्या मुली असतात पण आमच्या कॉलेज मध्ये असा मुलगाही होता.

ज्याच्यावर माझ्या मैत्रिणीही फिदा होता. मग मी तरी कोण आहे? तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता. 1 वर्षाने लहान होता. माझ्या काही मैत्रिणी त्याच्या वर्गात होत्या. मी माझ्या मैत्रिणीवर खूप जळायचे. मला इतका आवडणारा मुलगा यांच्याच वर्गात का आहे! किती नशीबवान आहेत त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुली, त्याला दिवसभर बघू शकतात. त्याच्याशी बोलू शकतात. त्याच्याशी मैत्री करू शकतात. तसा तो दिसायचा कसा याच वर्णन करायचं झालं तर त्याच्या चेहऱ्यावर सतत हसू असायचं. तो शांत होता. पण त्याचे डोळे खूप काही सांगून जायचे. तो जेव्हाही मनापासून हसायचं तेव्हा त्याचे डोळे चमकायचे. डोळ्यांचा रंग कोणताही असू द्या, ते जर भावना व्यक्त करायला लागले तर किती सुंदर भासतात! मुख्य म्हणजे त्याचे डोळे कधीच खोट बोलायचे नाही. मला चांगलंच आठवतंय, एकदा त्याला आमचे शिक्षक तो नेहमी कॉलेजभर फिरत असतो म्हणून आमच्यासमोर त्याची कानउघडणी करत होते.

शिक्षक गेल्यावर त्याने आमच्याकडे बघून स्मितहास्य तर केले खरे परंतु; त्याचे मोठे डोळे दुखाणे चमकत होते. हा खोटारडेपणा त्याच्यासाठी कठीणच होता. त्याचा रंग भारतीय व्यक्तीचा साधारण गोरा असतो तसा गोरा होता. चेहरा थोडा उभट आणि हनुवटी थोडी निमुळती होती. ट्रीम केलेली दाढी त्याला अगदीच शोभून दिसायची. तो जेव्हाही यायचा तेव्हा सगळ्या नजर त्याच्याकडेच रोखून धरायच्या. जणू कोणत्या बॉलीवूड सिनेमाच्या नायकाकडे होतात तश्याच. त्याला येऊन 1 महिनाच झाला होता कि मुलींमध्ये तो प्रसिद्ध झाला. अश्या मुलांचा एक तोटा असतो. त्याच्याशी बोलायला मुली खूप घाबरतात. पण माझं तस नव्हतं. कारण शिक्षणासाठी 2 वर्ष मी मैत्रिणीसोबत खोली करून राहत होते. तोही त्याच परिसरात राहत होता. तो जाता येता समोरच असायचा! एकाच कॉलेज मध्ये आणि माझा जुनिअर असल्या कारणाने मी त्याच्याशी बोलणे महत्वाचे होते. त्याच बरोबर माझ्या मत्रीण एकाच वर्गात होत्या त्यामुळे वर्गमैत्रिण म्हणून बोलणे साहजिकच होते. मी काही त्याच्याशी बोलले नाही. पण माझ्या मैत्रिणी त्याच्याशी खुप बोलत होत्या. त्याची मस्करी करायच्या.

क्रश फक्त एकतर्फी प्रेम!Where stories live. Discover now