💔Loveless marriage💔Part.4

10 1 0
                                    


आजी साहेबांच काम नेहमी बाहेर असायच आणि मीरा ला ही त्यांचा बरोबर फिरावं लागत होत
आजी साहेबांना माहीत होत मीरा गरोदर आहे त्या ही तिला झेपेल असच काम सांगत होत्या पण मीराला आता उलटी मळमळचा त्रास जास्त होऊ लागला होता म्हणुन मग आजी साहेबानी तिला त्यांच्या फॅक्टरी बसुन काम करायच सुचवल. मीरा आजी साहेबांची मीटिंग सगळ फॅक्टरी मध्ये बसूनच मॅनेज करू लागली. वाड्यावरच कामात लक्ष देऊ लागली मीरा आपल काम अगदी मन लाऊन करत होती. आणि आपल्या दु:खातून ही बर्‍या पैकी सावरली होती.

मीरा ला पुन्हा कामावर रुजू होऊन आता चार महिने झाले होते. त्यातच मीराला नववा महिना लागला आणि अचानक एक दिवशी मीरा वाड्या वर असतानाच मिराला कळा सुरू झाल्या आजी साहेब आज घरी असल्यामुळे तिला लगेच दवाखान्यात दाखल करण्यात आल
किशोर नलिनी मृण्मयी आजी साहेब सुधा काळजीत होत्या..

देवा पोरी ने खूप सोसले आहे आता अजून नको तिची परीक्षा पाहु देवा.....( मनातच देवाला म्हणाल्या.... )

आणि काही वेळातच मीरा ची डिलेव्हरी झाली आणि तिने एका गोंडस बाहुलीला जन्म दिला. मीराच्या आयुष्यात पुन्हा रंग भरले परीच्या येण्याने....

मीरा ची डेलीव्हरी झाली तेव्हा एकदाच सासू बाई तिला आणि बाळाला पाहायला आल्या

तिला आणि बाळाला घेऊन जायच बोलत होत्या पण नलिनी ने त्यांना साफ नकार दिला. त्या ही काही न बोलता तिथून निघून गेल्या कारण छाया ने काही महिन्यापूर्वी एक दिवस सगळे सांगून टाकाल होत. किशोर नलिनी ही परी चा खुप लाड करत होते

मीरा फक्त दोन महिने घरी थांबली असेल आराम करायला पण नंतर मात्र पुन्हा आजी साहेबांन बरोबर कामावर रुजू झाली

आजी साहेबानी तिला सक्तीची सुट्टी ही देऊ केली पण मीरा ने आजी साहेबांच काही एकल नाही. पण आजी साहेब ही मीराच्या जिद्दी ला पाहून हैराण होत्या.

💔Loveless marriage💔Where stories live. Discover now