💔 Lovleless Marrainge💔पार्ट 8

18 1 0
                                    

मीरा घरी आली तेव्हा नुकताच अंधार पडायला सुरवात झाली होती आणि पावसाची चिन्ह दिसत होती तिने परीला मृण्मयी जवळ ठेवल आणि हात पाय धुवून किचन मधे शिरली वहिनी ला मदत करायला.

मिरे आजी साहेबांना ची तब्बेत कशी आहे आता??? ( किशोर ने काळजी ने विचारल) आज कंपनी मधे सगळी कडे तीच चर्चा चालू होती.

मीरा : बरी आहे आता.....

: का... व काय झाल आजी साहेबांना? आज शेतात बी बायका बोलत हुत्या वाड्यावर लय गाड्या आल्यात म्हणून... ( नलिनी ही कुतूहलाने विचारल)

हमउम्.. मोठे मालक आले आहेत. मुंबई वरुन त्यांचाच गाड्या आहेत - - - - किशोर म्हणाला

काल रात्री ब्लड प्रेशर वाढलं होत..... पण आता ठीक आहे. डॉक्टर सकाळी येऊन गेलेत - - -मीरा म्हणाली

मोठे मालक म्हणजे ते मुंबईला असतात ते??? (नलिनी ने आश्चर्याने विचारल.)

हो तेच...... लय झाक माणूस हाय बघ..... मैनेजर तर गप्प गार झाला होता त्यांचा समोर..... काय तो रुबाब आज कंपनी आल्या आल्या खूप काम मार्गी लावली मालकांनी पुर्ण कंपनी फिरून पहिली.. आन.... सगळ्यांची विचारपूस केली पगार पण वाढवायचा बोलत होते मालक...... पगार वाढला तर सगळ्यांना बर होईल... आता काही दिवस मालक इथेच आहेत कोल्हापूर मधे....... मला वाटत रोजच येतील कंपनी मधे आहे तो पर्यंत .... किशोर उत्साहाने सांगत होता

मीरा फक्त एकत होती....
रात्री ची जेवण झाल्यावर नलिनी किशोर आणि मीरा थोडा वेळ बसले असताना किशोर म्हणाला
मीरा तुझ्याशी थोड बोलायच होत

बोल ना दादा....... मीरा आपल्या मांडीवर झोपलेल्या परीला थोपटत किशोरला म्हणाली

आज अजय ने पुन्हा मला तुझ्यासाठी
लग्नाची मागणी घातली... त्याला तुझ्याशी लग्न करायच आहे - - तशी मीरा थोडी गोंधळून किशोर कडे पाहू लागली)

अजय म्हणजे आजी साहेबांच्या कंपनी मधे काम करणारा मॅनेजर त्याला दोन मुल होती पण बायको त्याला सोडून मुलांना घेऊन कायमची माहेरी निघून गेली होती त्याच्या दारू आणि जुगाराच्या व्यसनाला कंटाळून त्याला मिरा आधी पासूनच आवडत होती अगदी कॉलेज मधे असल्यापासुन पण त्याच ही लग्न झाल होत. पण तो तेव्हा ही मीराला खुप पटवण्याचा प्रयत्न करत होता. पण मीरा काही बधली( पटली) नाही त्यातच पुढे नंतर किशोरने मीराच लग्नच लावुन दिल आणि त्याच स्वप्नं स्वप्नं राहील.....काही एक महिन्याने मीरा कायमची माहेरी आली आणि पुन्हा त्याचा आशा पल्लवित झाल्या त्या नंतर त्याने त्याने एक दोनदा रस्त्यात गाठून मीराला लग्नाबद्दल विचारल (अगदी धमकी दिली होती)

💔Loveless marriage💔Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang