💔Loveless marriage💔Part28

18 0 0
                                    

नेहेमी सारखीच कार मधे मिहीर परीची मस्ती चालू होती आजी साहेब आणि मल्हार दोघे ही कामच काहीतरी बोलत होते आणि मीरा ती आपली तो वीतभर डोक्यावर पदर घेऊन मान खाली घालून शांत होती...

थोड्या वेळात कार वाड्यावर पोहोचली

गोदा काकूनीं मिहीर परी मीराच्या अंगावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला....आल्या गेल्याची भूता खेताची.. कुणाचीबी नजर लागली असल तर इथेच... मरू दे...... या आता आत.... म्हणत तिघांना ही गोदा काकूनी घरात घेतल

मल्हार गाडी पोर्च मधे पार्क करून वर जाताजाता कॉफीची ऑर्डर देऊन आपल्या रूम मधे आला आणि लागलीच फ्रेश होऊन लॅपटॉप ऑन करून बसला ...

वहिनी साब आला नव्ह पोर घरी नव्हती तर करमना बघा... आता बघा कसा वाडा दणाणून सुटलाय----गोदा काकू चहा देत मीराला म्हणाल्या

ती हॉल मध्येच थांबली होती मिहीर परी खेळत होते म्हणून - - - - - गोदा काकू तुम्ही कशाल चहा घेऊन आलात मी येणारच होते आत....

राहू दया... ओ तुम्हीबी पोरांच करून दमतायसा नव्ह. घ्या चहा घ्या... मी पण तवर एवढी कॉफी आणि चहा आजी साहेब आण मालकांसनी देऊन येते.... म्हणून निघून गेल्या..

काही मिनिटाने काकू बाहेर आल्या

मीरा ताई आजी साहेबानी तुम्हांसनी आत बोलावलय बघा..... गोदा काकू आजी साहेबांचा निरोप तिला देऊन आणि कॉफीचा ट्रे घेऊन मल्हार कडे निघाल्या

आजी साहेब तुम्ही बोलावल----मीरा डोक्यावरचा पदर सावरत रूम मधे येत म्हणाली...

हो या बसा...मीरा बाई तुम्हाला आपल्या गावच्या कॉलेजचे प्रिन्सिपल शिरोडकर माहीतच असतिल खूप चांगले गृहस्थ आहेत..आपल्या गावच्या शाळेत आधी शिक्षक म्हणून काम करत होते आपले मल्हारराव ही काही वर्ष त्यांच्या हाताखाली शिकले आहेत.... आणि आता काही वर्षापूर्वी त्यांना आपल्या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून पद सांभाळल आहे... आपल्या गावच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून खूप प्रयत्न केले आहेत त्यांनी आता पर्यंत... .

💔Loveless marriage💔Where stories live. Discover now