💔Loveless Marriage💔 part 22

22 1 0
                                    

दिवस दुसरा - - - - - -

नेहमी प्रमाणे मीराला पहाटे चारलाच जाग आली आजुबाजूला पाहिल तर सगळ जग वेगळ भासल गोंधळलीच (मनात) कुठे आहे मी?????.. थोडा मेंदूवर तान दिला अन मग लक्षात आल कालचं आपल लग्न झालंय.... आणि आपण इनामदारच्या वाड्यात आहोत

तसच तिने बाजूला पाहिल तर मिहीर परी दोघेही छान झोपले होते मिहीरच्या चेहर्‍यावर तर झोपेत पण गोड हसू होत....तिने ने हसत हळूच त्याच्या गालावर ओठ टेकवले - - - झोपते किती छान दिसत माझ बाळ 🥰... पुन्हा स्वतःच्या विचारांवर गोंधळली मिहीर कडे पाहत - - - यांनी जस परीला आपल्या आयुष्यात स्विकारल तस मला सुधा आई म्हणून स्वीकारतील का..?... पण ठीक आहे तुम्ही नाही स्विकारल अजून...... पण.. तुमच्या या आई ने तुम्हाला तीच पाहिल बाळ म्हणून कालच स्विकारलय.....तिने गोड हसत
मिहीर च्या अंगावर ब्लँकेट सरळ केल

परी उठे पर्यंत आपली आंघोळ होईल म्हणून साडी घेतली आणि घाईत बाथरूम कडे निघाली
आत जाऊन साडी सोडली असेल की परीच्या रडण्याचा आवाज आला..अरे देवा !!!!!ही एवढ्या लवकर कशी उठली....

बोलत तशीच घाईत कशी तरी साडी अंगाभोवती लपेटली आणि बाहेर आली अन पाहिल लेकीला उचल आणि झोपलेल्या मिहीरला थोपटल उगीच परी मुळे तो ही उठायचा नाहीतर ...थोड्या वेळाने परी सुधा दूध पिऊन शांत झोपून गेली..

आंघोळ करून आवरायला घेतल आणि घरून आणलेली साधीच काठ पदराची साडी नेसली आणि मिरर समोर उभी राहून ओल्या केसांना मोकळ सोडल

केस पुसताना सहजच आता गळ्यातल्या त्या मंगळसूत्र कडे पाहिल मोठ जाड भरीव सोन्याच मंगळसूत्र.. त्याच बरोबर गळ्यातल्या काळ्या दोऱ्याकडे लक्ष गेल विरलेला तो दोरा आणि त्यात असलेल्या त्या छोट्या लॉकेट कडे पाहिल
त्या मंगलसूत्राने जणू त्याच अस्तित्वच मिटल होत

आनंदची शेवटची आठवण....
त्याने तिच्या साठी घेतल ते छोटसं लॉकेट....
थोड्या दिवसाने चैन घ्यायची होती पण पैसे कमी पडले आणि मीरा ने ते लॉकेट काळ्या दोऱ्यात गुंफल पण चैन घेण्याआधीच आनंद हे जग सोडून निघून गेला होता थोड्या वेळासाठी श्वास अडकला.. जुन्या आठवणी ताज्या झाल्या
डोळे नकळत झाकले गेले तसा आनंदचा चेहरा डोळ्या समोर आला..... माफ करा आनंद मला आपली साथ फक्त इथवरच होती...पण तुम्ही नेहमीच माझ्या मनाच्या एका कोपर्‍यात असाल ....

💔Loveless marriage💔Where stories live. Discover now